23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeआंतरराष्ट्रीयदोन पाकिंना आंतराराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करा

दोन पाकिंना आंतराराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करा

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्री कॅथरीन कोलोना यांच्या भारत भेटीपूर्वी, दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी मोहिउद्दीन औरंगजेब आलमगीर आणि अली कासिफ जान यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचे आवाहन केले आहे.

मंत्री म्हणून कोलोना पहिल्यांदाच भारतात येत आहेत. यादरम्यान त्या १४-१५ सप्टेंबर रोजी दिल्लीत असतील आणि वरिष्ठ अधिका-यांची भेट घेतील. या प्रकरणाशी संबंधित अधिका-यांच्या मते, औरंगजेब आलमगीर उर्फ ​​मुजाहिद भाई आणि अली कासिफ जान उर्फ ​​अली कासिफ यांना यूएपीए १९६७ कायद्यान्वये १२ एप्रिल रोजी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने दहशतवादी घोषित केले होते. हे दहशतवादी पाकिस्तानातील बहावलपूर आणि चारसद्दाचे आहेत. २०१९ मध्ये पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी आहेत. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.

दोन्ही देशांमधील संबंध दृढ होणार
आलमगीर जैश-ए-मोहम्मदसाठी कट रचण्यात, निधी उभारण्यात सहभागी आहे. अफगाण दहशतवाद्यांची जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी आणि दहशतवादी घटनांमध्येही आलमगीरचा हात आहे. दुसरीकडे, खायबर पख्तूनखा चौरसद्दा येथील रहिवासी अली कासिफ हा जैशचा सक्रिय ऑपरेशनल कमांडर आहे. अली कासिफ २०१६ मध्ये पठाणकोटमधील एअरफोर्स स्टेशनवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता.

राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) तपासात आणखी अनेक दहशतवादी घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. एलओसीच्या सियालकोट भागातून तो आपले नेटवर्क चालवतो. काश्मीर खो-यात घुसखोरी करण्यातही त्याचा सक्रिय सहभाग आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर आणि घेतलेल्या निर्णयानंतर फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री कोलोना यांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या