26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपुतीन यांच्यावर हल्ला

पुतीन यांच्यावर हल्ला

एकमत ऑनलाईन

कारवर बॉम्बहल्ला, पुतीन बालंबाल बचावले
मॉस्को : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. सुदैवाने पुतिन पूर्णपणे सुरक्षित आहेत. पुतिन त्यांच्या घराजवळ असतानाच त्यांच्या ताफ्याचा रस्ता अडवण्यात आला आणि हा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली आहे. तसेच पुतिन यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अनेक कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले.

पुतिन यांच्यावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी २०१७ साली पुतिन यांनी आपल्यावर पाच जीवघेणे हल्ले झाल्याची माहिती दिली होती. पुतीन यांच्या लिमोझिन कारवर बॉम्बने हल्ला झाला. रशियन अध्यक्षांच्या कारच्या डाव्या-उजव्या बाजूला जोरदार स्फोट झाला. सुदैवाने पुतीन यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. पुतीन यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्यांपैकी अनेकांना अटक करण्यात आली. दरम्यान, सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेऊन पुतीन यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी योग्य काळजी घेत त्यांचा ताफा सुरक्षितपणे अधिकृत निवासस्थानापर्यंत आणला.

ब्रिटिश वृत्तपत्र द सनने दिलेल्या वृत्तानुसार पुतीन यांच्या हत्येचा प्रयत्न नेमका कधी झाला, त्याबद्दलची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. या दाव्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. पुतीन यांचा ताफा मार्गक्रमण करत असताना एक किलोमीटर रुग्णवाहिकेने एक कार थांबवली. ही ताफ्यातील पहिली कार होती. त्यावेळी पुतीन यांच्या कारच्या डाव्या बाजूला जोरदार आवाज झाला आणि धूर पसरला. त्यांची कार घटनास्थळावरून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आली.

सुरक्षा जवान, अधिकारी निलंबित
पुतिन यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या अनेक जवानांचे आणि अधिका-यांचे निलंबन करण्यात आले, तर काहींना अटकही करण्यात आली. कारण राष्ट्रपतींच्या मुव्हमेंटबाबत खूपच कमी जणांना माहिती असते. ही माहिती लिक केल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.

 

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या