24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपृथ्वीसारखा दिसणारा ग्रह; उगवतात चक्क दोन सूर्य!

पृथ्वीसारखा दिसणारा ग्रह; उगवतात चक्क दोन सूर्य!

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : शास्त्रज्ञ सतत पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागाचा बारकाईने अभ्यास करत असतात. संपूर्ण ब्रम्हांडमध्ये आपल्यासारखे आणखी एखादे जग असेल काय असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र प्रत्येकाला त्याचे उत्तर शोधणे शक्य नाही. अशाच एका प्रश्नाच्या शोधात शास्त्रज्ञांच्या एका टीमने पृथ्वीपासून जवळ जवळ १०० प्रकाश वर्षाच्या अंतरावर एका ग्रहाचा शोध लावला. हा ग्रह पूर्णपणे पाण्याने वेढलेला आहे. वैज्ञानिकांच्या मते या ग्रहाचे नाव टीओआय-१४५२ आहे.

हा युनिवर्सचा असा भाग आहे ज्यामध्ये तापमान अधिकही नाही आणि कमीही नाही, याठिकाणी मध्यम वातावरण आहे. शास्त्रज्ञांच्या मते, या ग्रहावर पाणी असल्याचाही त्यांचा अंदाज आहे. शास्त्रज्ञांनी त्यांच्या अभ्यासाच्या आधारावर या ग्रहाबाबत मोठा खुलासा केला. हा ग्रह पृथ्वीपेक्षा ७० पटीने मोठा असू शकतो. नासाने ट्रांझिटिंग एक्झोप्लॅनेट सर्वे सॅटेलाईटच्या मदतीने या ग्रहाचा शोध लावला.

पृथ्वीसारखा दिसणारा
आतापर्यंतचा उत्तम ग्रह
नासाच्या मते, या ग्रहाचा शोध रंजक होता. शास्त्रज्ञांना या ठिकाणी पाणी असल्याची आशा आहे. या ग्रहावर अनेक महासागर असण्याचीही शक्यता आहे. तसेच हा ग्रह हायड्रोजन आणि हेलियमच्या वातावरणाने बनलेला असू शकतो असंही शास्त्रज्ञ म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या