23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeआंतरराष्ट्रीयबांगलादेश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर

बांगलादेश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर

एकमत ऑनलाईन

ढाक्का : संपूर्ण जगभरात महागाईचा कहर सुरु आहे. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढत आहेत त्यामुळे अनेक देशांना मोठी किंमत चुकवावी लागत आहे. श्रीलंका, पाकिस्तान या देशांना महागाईचे सर्वाधिक चटके बसले आहेत. या देशांवर मंदीचे काळे ढग दाटले. आता पाकिस्तान श्रीलंकेपाठोपाठ बांगलादेशही आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहे.

बांगलादेशात एका रात्रीत इंधनाच्या दरात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बांगलादेशच्या इतिहासात आतापर्यंतची ही सर्वाधिक इंधन दरवाढ मानली जात आहे. रात्रीपासूनच पेट्रोल पंपावर रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत. गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक महागाईची कळ सोसणा-या बांगलादेशच्या नागरिकांमध्ये इंधन दरवाढीमुळे संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

यासंदर्भात बांग्लादेशच्या वीज, ऊर्जा आणि खनिज संसाधन मंत्रालयाने इंधनाच्या किमती वाढण्यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमतीत वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. कमी किमतींत इंधन विकल्यामुळे बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनला फेब्रुवारी ते जुलै दरम्यान ८,०१४.५१ टक्­यांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, श्रीलंकेतील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशची जनताही सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. ठिकठिकाणी नागरिकांकडून जाळपोळ आणि आंदोलने करण्यात येत आहेत. त्यातच बांगलादेश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कर्जात बुडाला आहे. बांगलादेशवर ‘आयएमएफ’च्या ७६२ मिलियन डॉलरच्या कर्जाचा डोंगर आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या