बोरिस जॉन्सन सरकार अडचणीत
लंडन : ब्रिटनचे बोरिस जॉन्सन सरकार सध्या अडचणीत सापडले आहे. ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जावेद यांनी राजीनामा दिला आहे. सुनक यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पत्र लिहून राजीनामा दिला. यामध्ये त्यांनी त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
ऋषी सुनक यांनी स्वत: ट्वीट करून याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, सरकार योग्य, गांभीर्याने आणि सक्षमपणे चालवले जाईल, अशी जनतेची अपेक्षा असते. परंतु अनेकदा तसे होत नाही. मंत्री म्हणून ही माझी शेवटची नोकरी असू शकते. परंतु मला विश्वास आहे की, या स्टँडर्डस लढले पाहिजे. यामुळेच मी पंतप्रधान बोरिस यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देत आहे.
आरोग्य मंत्री साजिद जावेद म्हणाले की, मला हे सांगताना खेद वाटतो की तुमच्या नेतृत्वाखाली ही परिस्थिती बदलणार नाही आणि त्यामुळे तुम्ही माझा विश्वास गमावला आहे. जॉन्सन सरकारच्या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सरकारला धोका निर्माण झाला असून आता पंतप्रधान बोरिस जॉन्सनही राजीनामा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.