27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयब्रिटनच्या राणीवर सोमवारी अंत्यसंस्कार

ब्रिटनच्या राणीवर सोमवारी अंत्यसंस्कार

एकमत ऑनलाईन

लंडन : ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. याआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रविवारी दुपारी लंडनमधील वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये पोहोचल्या. त्यांनी भारताच्या वतीने राणीला श्रद्धांजली वाहिली.

ब्रिटनमध्ये १० दिवसांचा राजकीय दुखवटा आहे. ८ सप्टेंबर रोजी राणीचे निधन झाले. अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख अंत्यसंस्कारात सहभागी होणार आहेत. मात्र, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन कधी येणार, हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या