22.1 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभारतीय महिलेचा मृत्यू; पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्याचा राजीनामा

भारतीय महिलेचा मृत्यू; पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्याचा राजीनामा

एकमत ऑनलाईन

लिस्बन : एका भारतीय गर्भवती महिलेच्या मृत्यूवरून पोर्तुगालमध्ये खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर महिलेच्या मृत्यूमुळे आरोग्यमंत्री डॉ. मार्टा टेमिडो यांना पायउतार व्हावे लागले.

पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे एका रुग्णालयातून दुस-या रुग्णालयात नेत असताना एका भारतीय महिला पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र, या महिलेने निधनापूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला. ही भारतीय महिला पोर्तुगालला फिरायला गेली होती.

अशा प्रकारची ही पहिलीच घटना नसून, अलिकडच्या काळात डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेअभावी रुग्णांना याचा फटका सहन करावा लागत आहेत. डॉक्टर मार्टा टेमिडो २०१८ पासून पोर्तुगालच्या आरोग्य मंत्री होत्या आणि त्यांना कोरोना काळात खंबीर सामना करण्याचे श्रेयदेखील दिले जाते.

भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर ही बातमी मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आणि सोशल मीडियावर खळबळ उडाली. या घटनेनंतर अनेकांनी पोर्तुगीज सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या सर्व प्रकारामुळे दबावाखाली आलेल्या पोर्तुगाल सरकारने आरोग्यमंत्री डॉ. मार्टा टेमिडो यांचा राजीनामा घेतला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या