24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभूकंपाच्या धक्क्यांनी तैवान हादरले

भूकंपाच्या धक्क्यांनी तैवान हादरले

एकमत ऑनलाईन

इमारती जमीनदोस्त, रस्त्यांना भेगा, रेल्वेही घसरली
हुवालियन : तैवानमध्ये २४ तासांत ३ वेळा भूकंप झाला. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तैवानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण-पूर्व भागातील तायतुंग काऊंटी भूकंपाचे मुख्य केंद्र आहे. शनिवारी याच भागात ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यानंतर रविवारी सकाळी ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. तसेच रविवारी दुपारी ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. त्यामुळे तैवानमधील अनेक रस्त्यांना तडे गेले आहेत.

दरम्यान, युली येथे एक दुकान पडले असून, चार लोक खाली दबले आहेत. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पूल कोसळल्याने वाहनेही कोसळली आहेत. डोंगली स्थानरावर ट्रेन रुळावरुन खाली उतरली. रेल्वे स्थानकाचे छतही कोसळले. दरम्यान, यूएस पॅसिफिर त्सुनामी वॉर्निग सेंटरने, या भूकंपानंतर तैवानामध्ये त्सुनामी अलर्ट जारी केला आहे.

तैवान रिंग ऑफ फायर परिसरात येतो. भौगोलिक कारणामुळे येथे सर्वाधिक भूकंप, त्सुनामी येतात. तसेच ज्वालामुखीचे स्फोट होत असतात. तैवानमध्ये २०१६ मध्ये आलेल्या भूकंपात १०० लोकांचा मृत्यू झाला होता. १९९९ मध्ये आलेल्या ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात २००० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

झाडे आणि दगड
डोंगरावरुन कोसळली
संपूर्ण तैवानमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले असून राजधानीत मोठे नुकसान झाले आहे. काही इमारतींना तडे गेले आहेत. ताइनान आणि काओसंग या ठिकाणी भूकंपाचा जास्त प्रभाव दिसल नाही.

२ दिवसांत १०० धक्के
तैवानमध्ये गेल्या २ दिवसांत १०० पेक्षा जास्त भूकंपाचे धक्के बसले आहेत. हुआलियन आणि टाइटुंहला भूकंपाचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. तैवानच्या न्यूज एजन्सीनुसार टाइटुंग क्षेत्रात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. हा केंद्रबिंदू जमिनीपासून १० किलोमीटर अंतरावर होता.

त्सुनामीचा धोका
भूकंपाच्या धक्क्याने तैवान हादरले असून, या भूकंपाच्या धक्क्याने आता तैवानमध्ये त्सुनामी लाटेचा धोका निर्माण झाला आहे. यासोबतच जपानमध्येदेखील ३.२ फूट उंच लाटांचा त्सुनामी अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे भूकंपाच्या धक्क्यानंतर दोन्ही देशांना त्सुनामीची चिंता अधिक भेडसावू लागली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या