21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeआंतरराष्ट्रीयलाहोरमधील १२०० वर्षापूर्वीच्या वाल्मिक मंदीराची पुनर्बांधणी

लाहोरमधील १२०० वर्षापूर्वीच्या वाल्मिक मंदीराची पुनर्बांधणी

एकमत ऑनलाईन

लाहोर : पाकिस्तानातील लाहोर येथील १२०० वर्षे जुने मंदिर दीर्घ न्यायालयीन लढाईनंतर बांधण्यात येणार आहे. या मंदिरात राहत असलेल्या बेकायदेशीर लोकांना बाहेर काढण्यात येणार असल्याचे देशातील अल्पसंख्याक पूजा स्थळांवर देखरेख करणा-या फेडरल संस्थेने सांगितले आहे.

इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डने लाहोर येथील वाल्मिकी मंदिरावर ताबा मिळवला होता. कृष्ण मंदिराव्यतिरिक्त, वाल्मिकी मंदिर हे लाहोरमधील एकमेव हिंदूंचे कार्यशील मंदिर आहे. या मंदिरावर एका ख्रिश्चन कुटुंबाचा ताबा होता. हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा करणारे ख्रिश्चन कुटुंब गेल्या दोन दशकांपासून केवळ वाल्मिकी जातीतील हिंदूंनाच मंदिरात पूजेसाठी सोय करत असल्याची माहिती समोर आली.

येत्या काही दिवसांत वाल्मिकी मंदिरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. आज १००हून अधिक हिंदू, काही शीख आणि ख्रिश्चन नेते वाल्मिकी मंदिरात जमले होते. हिंदूंनी या मंदिरात धार्मिक विधी केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान ख्रिश्चन कुटुंबाने गेल्या २० वर्षापासून या मंदिरावर कब्जा केलेला होता.

मंदिराची जागा इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डच्या नावावर करण्यात आली होती. त्यानंतर ख्रिश्चन कुटुंबाने २०१०-११ मध्ये जागेच्या मालकावर आक्षेप घेत कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हा वाद कोर्टात प्रलंबित होता, त्यानंतर १९९२ मध्ये, भारतात बाबरी मशीद पाडल्यानंतर, संतप्त जमावाने वाल्मिकी मंदिरावर सशस्त्र हल्ला केला. यात कृष्ण आणि वाल्मिकींच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली होती.

कोर्टात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणात पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या एक सदस्यीय आयोगाने सरकारला आपल्या शिफारशी सादर केल्या, ज्यामध्ये हिंदू समुदायाला चांगल्या सुविधा देण्यासाठी मंदिराचे नूतनीकरण करणे आवश््यक आहे असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता या मंदिराची पुनर्बांधणी होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या