35.2 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयलाहोरमध्ये स्फोट, ३ ठार, २० जखमी

लाहोरमध्ये स्फोट, ३ ठार, २० जखमी

एकमत ऑनलाईन

लाहोर : पाकिस्तानच्या लाहोरमधील अनारकली बाजार येथे गुरुवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात तीन जण ठार झाले असून किमान २० जण जखमी झाले आहेत. या स्फोटात टाइम डिव्हाईसचा वापर करण्यात आला होता, असे म्हटले जात आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला, ते ठिकाण भारतीय वस्तूंच्या विक्रीसाठी ओळखले जाते, असे पोलिसांनी सांगितले.

लाहोर पोलिसांचे प्रवक्ते राणा आरिफ यांनी स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. या स्फोटामुळे जवळपासच्या दुकानांच्या आणि इमारतींच्या खिडक्यांचे काच फुटले, तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय वस्तूंची विक्री होणा-या पान मंडईजवळ हा स्फोट झाला. दरम्यान, आतापर्यंत कोणत्याही गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. आम्ही स्फोटाचे स्वरूप जाणून घेत आहोत. स्फोटात २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे, असे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. मोहम्मद आबिद यांनी सांगितले. स्फोटाच्या ठिकाणी असलेल्या खड्ड्याने हा स्फोट टाइम डिव्हाईसने घडवून आणल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु इतक्या लवकर आम्ही याची पुष्टी करू शकत नाही. दहशतवादविरोधी विभाग आणि बॉम्ब निकामी पथकाचे अधिकारी याचा तपास करीत आहेत.

हल्ल्यामागे टीटीपीचा हात?
या हल्ल्यामागे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानात घुसून टीटीपीच्या एका उच्चपदस्थ कमांडरची हत्या केली होती. या हत्येचा सूड म्हणून आजचा स्फोट घडवून आणण्यात आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या