22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeआंतरराष्ट्रीयविमान प्रवासात अ‍ॅप्पलच्या एअर टॅग वापरावर बंदी

विमान प्रवासात अ‍ॅप्पलच्या एअर टॅग वापरावर बंदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आपल्या वेगळ््या वैशिष्ट्यामुळे अ‍ॅप्पलचा फोन जगभर लोकप्रिय आहे. विशेषत: विमानात याचा जास्त वापर केला जातो. एअरटॅगच्या मदतीने लोक आपले लगेज आणि त्यामध्ये ठेवलेला फोन फाईंड माय फोन ने ट्रॅक करतात. मात्र आता एअरलाइनने बंदी आणली आहे.

आता विमानातून प्रवास करणारे प्रवासी त्यांच्या लगेजला अ‍ॅप्पल एअरटॅग लावू शकणार नाहीत. सोबतच प्रवाशांना आता विमान प्रवासादरम्यान एअरटॅग ऑफ ठेवावे लागणार आहे.

काय आहे एअरलाइनचं म्हणणं?
एअरलाइनच्या मते, एअरटॅग लगेजमध्ये ठेवणे धोक्याचे आहे. यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र अ‍ॅप्पलने या गाईडलाईन लीथियम आयर्न बॅटरी डिवायसेससाठी होत्या, असा युक्तिवाद केला आहे.

काय सांगतात नियम?
इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनच्या गाइडलाइननुसार १५ इंच स्क्रिन डिस्प्ले असलेल्या अ‍ॅप्पल मॅकबूकमध्ये कमी व्होल्टची बॅटरी आहे. त्यामुळे गाइडलाइनमध्ये अ‍ॅप्पल एअरटॅगचा समावेश नसला तरी बॅटरीचा वापर एअरलाइन क्षेत्रात धोकादायक ठरतो. मात्र कंपनीच्या या निर्णयाला स्मार्ट डिव्हाईस निर्मात्यांनी विरोध केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या