18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयसिंगल असण्यातही आहे वेगळाच आनंद

सिंगल असण्यातही आहे वेगळाच आनंद

एकमत ऑनलाईन

 

न्यूयॉर्क : एकटे असल्याने नैराश्य येते, नको त्या सवयी लागतात, असा अनेकांचा समज असतो. त्यामुळे आनंदी आयुष्य जगायचे असल्यास तुम्हाला जोडीदाराची गरज असते असे अनेकांचे मत असते. यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. विशेषत: म्हातारपणात आपल्याला साथीदाराची गरज भासते, असेही अनेकांना वाटते. मात्र अनेकदा काही जण एकटेपणा स्वत:हून निवडतात. पण आनंदी राहण्यासाठी कोणा जोडीदाराची मुळात गरजच नसते, असे निरीक्षण एका अभ्यासातून समोर आले आहे.

तुम्ही एकटे राहून ही आयुष्याचा आनंद लुटू शकता. सिंगल असल्याने नैराश्य आले आहे, कशातच रस वाटत नाही, असेही काही जणांना वाटते. पण सिंगल राहण्याचेही अनेक फायदे आहेत, असे निरीक्षण या अभ्यासातून समोर आले आहे.

हे आहेत सिंगाल राहण्याचे फायदे
– सिंगल राहिल्यामुळे तुमचा स्ट्रेस लेवल कमी होतो
– जोडीदाराकडून आर्थिक दडपणाला सामोरे जावे लागत नाही
– सिंगल असल्याने नात्यातली भांडणे, वादविवाद, गैरसमज होत नाहीत
– निर्णयांवर कोणाचा हक्क नसतो
– स्वत:चे निर्णय घेऊ शकता
– फिरण्याचे स्वातंत्र्य
– जबाबदा-यांचे ओझे नसते
– सिंगल असल्याने स्वत:सोबत घालवू शकता वेळ
– कुटुंब- मित्रांसोबत वेळ घालवण्याचे स्वातंत्र्य
– करिअरवर करता येतो फोकस

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या