25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeआंतरराष्ट्रीयहाँगकाँगला स्वायत्तता, पण नियंत्रण चीनचेच

हाँगकाँगला स्वायत्तता, पण नियंत्रण चीनचेच

एकमत ऑनलाईन

हाँगकाँग : ‘एक देश, दोन यंत्रणा’ या आराखड्याला आपले समर्थन असल्याचे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज स्पष्ट केले.

हाँगकाँगला ५० वर्षे स्वातंत्र्याची आणि स्वायत्ततेची मुभा असताना चीन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या अमेरिका, ब्रिटन आणि इतर देशांच्या टीकेला जिनपिंग यांनी याद्वारे उत्तर दिल्याचे मानले जाते.

हाँगकाँगनेही चीनच्या नेतृत्वाचा आदर राखणे आवश्­यक आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
ब्रिटनकडून हाँगकाँगचा ताबा चीनकडे आल्याच्या घटनेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जिनपिंग यांनी ‘एक देश, दोन यंत्रणे’चे जोरदार समर्थन केले.

१९९७ ला निश्चित झालेल्या या आराखड्यामुळे चीनचा भाग असूनही हाँगकाँगला ५० वर्षांपर्यंत स्वायत्तता आणि वेगळे सरकार मिळणार असल्याचे कबूल करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हाँगकाँगमधील चीनचा हस्तक्षेप वाढला.

येथील निवडणुकीच्या नियमांमध्येही त्यांनी बदल केला. त्यामुळे ५० वर्षे पूर्ण होण्याआधीच चीनकडे हाँगकाँगचा संपूर्ण ताबा जाणार असल्याचा आरोप अमेरिका आणि ब्रिटन या देशांनी केला होता. त्याला जिनपिंग यांनी उत्तर दिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या