24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीय१५०० पाकिस्तानी हिंदू पाकमध्ये परतले

१५०० पाकिस्तानी हिंदू पाकमध्ये परतले

एकमत ऑनलाईन

लाहोर : भारतीय नागरिकत्व मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी हिंदू निर्वासित पुन्हा पाकिस्तानात पोहोचत असल्याचे समोर आले आहे. परदेशी निर्वासितांना भारतीय नागरिकत्व न देण्याच्या निर्णयामुळे पाकिस्तानी हिंदू परतत असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानातील अत्याचारामुळे हिंदू भारतात आले होते. जुलै २०२२ पर्यंत ३३४ पाकिस्तानी हिंदूू निर्वासित पाकिस्तानात परतले असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे.

२०२१ पासून या वर्षापर्यंत सुमारे १,५०० पाकिस्तानी हिंदू पाकिस्तानात परतले आहेत. केंद्र सरकारसह राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे पाकिस्तानातून आलेल्या हिंदू निर्वासितांमध्ये निराशा पसरली आहे. यापैकी बहुतेक हिंदूंकडे भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या औपचारिकता पूर्ण करण्यासाठी पैसा किंवा कागदपत्रे नसल्यामुळे पाकिस्तानला परत जात आहेत असे हिंदू सिंग सोढा यांनी सांगितले.

पाकिस्तानात सुमारे २५,००० हिंदू आहेत जे भारतीय नागरिकत्व घेण्यासाठी इच्छुक आहेत. मागच्या १० ते १५ वर्षापासून हे हिंदू येथे असून त्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची खात्री नसल्यामुळे राजस्थानातील जैसलमेर येथून २०२१ ते या वर्षापर्यंच सुमारे १,५०० पाकिस्तानी हिंदू पाकिस्तानात परतले असल्याची माहिती सोढा यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, २००४ आणि २००५ मध्ये नागरिकत्व देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सुमारे १३,००० पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व मिळाले, परंतु गेल्या ५ वर्षांत केवळ २००० पाकिस्तानी हिंदूंना नागरिकत्व देण्यात आले.

पाकिस्तानातून स्थलांतर केलेल्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या नियमानुसार, नागरिकत्वासाठी अर्ज करण्यासाठी, पाकिस्तानी स्थलांतरितांच्या पासपोर्टचे नूतनीकरण करावे लागते आणि पासपोर्ट लागू होण्यासाठी पाकिस्तानी दूतावासाकडून प्रमाणपत्र देखील सादर करावे लागते. त्यामुळे हा खर्च जास्त होतो. हा खर्च करूनही भारताचे नागरिकत्व मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे पाकिस्तानी हिंदुंचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या