24.7 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीयरशियन लसीचे १० कोटी डोस भारतात मिळणार

रशियन लसीचे १० कोटी डोस भारतात मिळणार

एकमत ऑनलाईन

मास्को : जगात सर्वात आधी मंजुरी मिळालेली रशियाची स्पुटनिक व्ही लस लवकरच भारतात उपलब्ध होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून या लसीसाठी भारताची रशियन लस निर्मात्यांबरोबर चर्चा सुरू होती. गमालेया संशोधन संस्थेने ही लस विकसित केली आहे. रशियाने डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज बरोबर करार केला आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने ही माहिती दिली. डॉ. रेड्डी लॅबला रशिया स्पुटनिक व्ही लशीचे ट्रायल म्हणजे चाचणी आणि वितरणासाठी १० कोटी डोस देणार आहे.

लसीची मानवी चाचणी म्हणजे क्लिनिकल ट्रायल आणि भारतात वितरणासाठी डॉ. रेड्डी लॅबला सहकार्य करणार असल्याचे सांगण्यात आले. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर प्रक्रिया लगेच सुरू होईल, असे आरडीआयएफकडून सांगण्यात आले. १०० पेक्षा कमी जणांवर लसीची चाचणी केल्यानंतर सर्वसामान्यांसाठी ही लस रशियात उपलब्ध करून देण्यात आली. पुरेशा चाचणीअभावी ही लस हानीकारक ठरु शकते, असे वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत होते. काही दिवसांपूर्वी लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही लस सुरक्षित असल्याचे म्हटले होते.

मराठा आरक्षणासाठी पक्षभेद बाजूला ठेऊन एकजुटीने लढणार ! -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या