26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीयइस्रायल-हमास युद्धात १०३ ठार

इस्रायल-हमास युद्धात १०३ ठार

एकमत ऑनलाईन

तेल अविव : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील हमास या संघटनेतील संघर्ष आता युद्धासारखाच पेटलेला आहे. शुक्रवारी इस्रायली फौजांनी गाझा पट्टीवरील हमासच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढविले. या हल्ल्यात हमासचे रॉकेट प्रक्षेपणस्थळच उद्ध्वस्त झाले आहे. हमासने इस्रायलच्या दिशेने सोडलेली ३०० वर रॉकेट चुकून गाझापट्टीवरच कोसळली.

हमास आणि इस्रायल संघर्षात आतापर्यंत १०३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २७ बालकांचा समावेश आहे. पैकी ७ इस्रायलची, तर उर्वरित गाझापट्टीतील आहेत. या २७ पैकी कुणाचाही या संघर्षाशी संबंध नव्हता. जखमींची संख्या ५८० वर आहे. इस्रायलने गाझापट्टीकडे कूच केले असून, येथे सैन्य दैलाची तैनाती वाढविली आहे. गाझाहून आतापर्यंत इस्रायलवर १ हजार ७५० रॉकेट डागली आहेत. युनोचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी इस्रायल-हमास संघर्ष थांबविण्याचे आवाहन केले आहे.

दोन्ही डोस घेतले तरीही मास्क वापरणे अनिवार्यच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या