ओस्लो : नार्वेमध्ये ५ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. लसीकरणात फायजर-बायोएनटेकची लस वापरण्यात येत असून या लसीचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम जाणवत आहेत. लस घेतलेल्या १३ जणांचा मृत्यू झाल्याचे नार्वेतील आरोग्य विभागाने म्हटले आहे.रशियन वृत्तसंस्था स्पुटनिकने दिलेल्या वृत्तानुसार, १३ जणांच्या मृत्यूंमध्ये ९ जणांना गंभीर साइड इफेक्टस आणि सात जणांना कमी गंभीर साइड इफेक्टस जाणवले.
नार्वेत एकूण २३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा संबंध लसीसोबत आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. आतापर्यंत १३ लोकांच्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशीत अशक्त, वृद्ध व्यक्तिंचा मृतांमध्ये समावेश होता, असे दिसून आले आहे.