31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeआंतरराष्ट्रीयपाकिस्तानमध्ये १३०० वर्ष जुने मंदिर

पाकिस्तानमध्ये १३०० वर्ष जुने मंदिर

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद: पाकिस्तानमधील उत्तर-पश्चिम भागातील स्वात जिल्ह्यात १३०० वर्ष जुने हिंदू मंदिर आढळून आले आहे. स्वात मधील डोंगराळ भागात पाकिस्तानी आणि इतालवी पुरात्व विभागाच्या तज्ज्ञांनी हे मंदिर शोधले आहे. बारिकोट घुंडई भागात सुरू असलेल्या उत्खन्नात हे मंदिर सापडले आहे.

त्याच्या जवळच एक जल कुंडही आढळले आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या पुरात्व खात्याच्या अधिकाºयांनी याची गुरुवारी माहिती दिली. हे मंदिर विष्णू देवाचे असल्याचे सांगण्यात आले. या मंदिराची निर्मिती १३०० वर्षांपूर्वी हिंदू शाही काळाच्या दरम्यान करण्यात आली होती.

हिंदू शाही अथवा काबूल शाही (इ.स. ८५० ते १०२६) दरम्यानचे राजघराणे आहे. या हिंदू राजवंशाने काबूल खोरे (पूर्व अफगाणिस्तान), गंधार ( सध्याचा पाकिस्तान) आणि सध्याच्या भारताच्या उत्तर-पश्चिम भागात राज्य केले होते.

जळकोट तालुक्यातील ३२ शाळांची वाजणार घंटा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या