22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअफगाणमध्ये १८० पूरबळी, २५० जखमी

अफगाणमध्ये १८० पूरबळी, २५० जखमी

एकमत ऑनलाईन

काबूल : पाकिस्तानपाठोपाठ आता अफगाणिस्तानातही पुरामुळे हाहाकार झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. संयुक्त राष्ट्र आणि सत्ताधारी तालिबानच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे अफगाणिस्तानमध्ये पूर आला. या भीषण पुरात किमान १८२ लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत.

तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले, अचानक आलेल्या पुरात २५० हून अधिक लोक जखमी झाले, तर ३ हजाराहून अधिक घरो उद्ध्वस्त झाली आहेत. १६ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान किमान १८२ लोक मरण पावले असून या ४ दिवसांत अचानक आलेल्या पुराने ६३ जणांचा बळी घेतला.

युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, इतर ३० जण बेपत्ता आहेत. त्याच वेळी १३ प्रांतातील ८,२०० हून अधिक कुटुंबांना पुराचा फटका बसला.

३४ प्रांतांमध्ये पावसाची शक्यता
उत्तर परवान प्रांतातील तीन प्रभावित जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या पुरात डझनभर घरे वाहून गेली. येत्या काही दिवसांत अफगाणिस्तानच्या बहुतांश ३४ प्रांतांमध्ये आणखी पावसाची शक्यता असल्याचा इशारा स्थानिक हवामान खात्याने दिला. देशभरात मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे जुलैमध्ये ४० लोक आणि महिन्यापूर्वी १९ लोकांचा मृत्यू झाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या