25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home आंतरराष्ट्रीय बायडन प्रशासनात २० भारतीय

बायडन प्रशासनात २० भारतीय

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन: अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष जो बायडन २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. बायडन यांच्या प्रशासनात अमेरिकेतील प्रत्येक घटकाला स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय वंशाच्या तब्बल २० जणांना प्रशासनात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यातील १७ जण व्हाइट हाउसमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडणार आहेत.अमेरिकेच्या लोकसंख्येत भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या एक टक्क्यांच्या आसपास आहे. त्या तुलनेत भारतीय वंशाच्या नागरिकांना अधिक महत्त्वाच्या जबाबदा-या पार पाडण्याची संधी मिळत आहे.

अमेरिकन सर्जन जनरल म्हणून डॉ. विवेक मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, वनिता गुप्ता यांना कायदे मंत्रालयाच्या सहाय्यक अ‍ॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती केली आहे. परराष्ट्र सेवा माजी अधिकारी उजरा जेया यांना असैन्य सुरक्षा, लोकशाही आणि मानवाधिकाराबाबत अवर परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. भारतीय वंशाच्या समीरा फाझिली यांची राष्ट्रीय अर्थ मंडळाच्या उपसंचालक पदावर नियुक्ती केली आहे. व्हाइट हाउसमधील अर्थ खात्याशी संबंधित हे महत्त्वाचे पद आहे.

भारतीय वंशाच्या तिघांची नियुक्ती व्हाइट हाउसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत केली आहे. तरुण छाबडा यांना तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षेचे वरिष्ठ संचालक, सुमोना गुहा यांना दक्षिण आशिया विभागासाठी वरिष्ठ संचालक आणि शांती कलाथिल यांना लोकशाही व मानवाधिकार समन्वयक म्हणून नियुक्त केले आहे.

सरकारकडून नुसते ‘तारीख पे तारीख’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या