32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home आंतरराष्ट्रीय देशद्रोहाबद्दल २० इस्त्रायली अभियंत्यावर गुन्हा

देशद्रोहाबद्दल २० इस्त्रायली अभियंत्यावर गुन्हा

एकमत ऑनलाईन

येरुसलेम : इस्रायलमधून भारताची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. इस्त्रायलची २० अभियंत्यांनी एका आशियाई देशाला आत्मघाती ड्रोनची माहिती पुरविल्याची माहिती समोर आली आहे. इस्त्रायल सरकारने याबाबत संबंधित देशाचे नाव स्पष्टपणे सांगितले नसून तो देश चीन असल्याची चर्चा होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तास्थापनेनंतर त्यांनी सातत्याने इस्त्रायलवर वाढता विश्वास ठेवला आहे. इस्त्रायलच्या संरक्षण तंत्रज्ञानाचा झालेला मोठा विकासाची दखल घेत भारताने त्याला आपला संरक्षणविषयक रणनीतीतील महत्त्वाचा देश मानले आहे. भारताने इस्त्रायलकडून अब्जावधी डॉलर किंमतीची शस्त्र खरेदी केली आहे. मात्र इस्त्रायलवरील विश्वासार्हतेला तडा बसेल, अशी बातमी असून इस्त्रायल सरकारने त्यांच्या २० अभियंत्यांनी अत्यंत घातक अशा आत्मघाती ड्रोनचे तंत्रज्ञान एका आशियाई देशाला (चीन) विकल्याचा आरोप लावला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत असून जर तो देश चीन असेल तर भारताची चिंता वाढणार आहे.

इस्रायलच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित २० जणांनी या आशियाई देशासाठी आर्म्ड लोटेरिंग ड्रोन क्षेपणास्त्र अथवा आत्मघाती ड्रोनचे बेकायदेशीरपणे डिझाइन तयार करणे, त्याचे उत्पादन तयार करण्याचा प्रयत्न केला. आपल्या शस्त्रविक्री व्यवसायावर परिणाम होऊ नये यासाठी इस्रायलने त्या आशियाई देशाचे नाव उघड केले नाही. हे वृत्त समोर येण्याआधी तीन देशांना हे घातक ड्रोन क्षेपणास्त्र देण्याचा करार करणार असल्याचे इस्त्रायलने जाहीर केले आहे. त्यानूसार या तीन देशांमध्ये भारताचाही समावेश असल्याचे म्हटले आहे. घातक असलेल्या हारोप ड्रोनची निर्मिती इस्रायलची कंपनी इस्त्रायल एअरोस्पेस इंडस्ट्री करत आहे.

हारूप ड्रोनचे वैशिष्टय
– या ड्रोनमध्ये असलेली अ‍ॅण्टी रडार होमिंग सिस्टम शत्रुच्या रडारलादेखील अटकाव करू शकते. या ड्रोनला आपले लक्ष्य न सापडल्यास पुन्हा आपल्या तळावर दाखल होतो. लक्ष्य आढळून आल्यास हा ड्रोन त्याला धडक देऊन स्वत:ला उडवून देतो.
– मागीलवर्षी अजरबैझान आणि आर्मेनियात झालेल्या युद्धात अजरबैझानने हारोप ड्रोनचा वापर केला होता. या ड्रोनच्या माºयासमोर आर्मेनियाचा एअर डिफेन्स सिस्टम आणि टँक निष्प्रभ ठरले होते. परिणामी अजरबैझानच्या सैन्याला युद्धात आर्मेनियाला नमविण्यात यश आले होते.
– याआधीही इस्रायल चीनला देखरेख ठेवण्यासाठी हे ड्रोन देणार होता. मात्र, अमेरिकेने हा व्यवहार थांबवला होता.
– विश्लेषकांच्या दाव्यानूसार जर हे तंत्रज्ञान चीनच्या हाती गेल्यास भारत आणि अमेरिकेसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच हे तंत्रज्ञान इराण आणि उत्तर कोरियाकडे जाऊ नये अशी भीती इस्रायलला वाटत आहे.
– भारताने वर्ष २०१९ मध्ये इस्रायलकडून १५ हारोप ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

(वि)मान-अपमान ! मंत्रालय-राजभवनातील संघर्षाचा नवा अंक !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या