29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeआंतरराष्ट्रीय३.३ लाख क्रेडिट, डेबिट कार्ड डेटाचा झाला लिलाव

३.३ लाख क्रेडिट, डेबिट कार्ड डेटाचा झाला लिलाव

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ऑनलाइन गिफ्ट कार्ड पोर्टलने आपला डेटा डार्क वेबला विकल्याची माहिती मिळाली आहे. या डेटामध्ये ३.३ लाख क्रेडिट आणि डेबिट कार्ड डिटेल्ससह २८५ कोटी रुपयांच्या गिफ्ट कार्डचा देखील समावेश आहे. सायबर सिक्योरिटी फर्म जेमिनी ऍडव्हायझरीने याचा खुलासा केला आहे.
जेमिनी ऍडव्हायझरीनुसार फेब्रुवारी २०२० मध्ये प्रसिद्ध रशियन डार्क वेब हॅकर फोरम वर या डेटाचा लिलाव होताना दिसून आला. या डेटाबेसचा आधीच लिलाव झाला आहे, असे सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये गिफ्ट कार्ड्ससह क्रेडिट आणि डेबिट कार्डची किंमत सुमारे ३०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

माहितीनुसार, डार्क वेबवर जे गिफ्ट कार्ड्स डेटाबेस सापडले त्यांमध्ये ते ऍमेझॉन, एअरबीएनबी, मॅरियट, नाईके, वॉलमार्ट आदींचे आहेत. हॅकर्स या चोरी झालेल्या गिफ्ट काडर्सची विक्री दहा हजार डॉलर्सच्या लिलावाच्या किमतीवर करत असल्याचीही बातमी आहे. तर, थेट खरेदी केल्यावर त्यांची किंमत १५ हजार डॉलर्स म्हणजेच ११ लाख भारतीय रुपये इतकी आहे.

लागली १५ हजार डॉलर्सची बोली
जेमिनी ऍडव्हायझरीनुसार हेही दिसून आले आहे की, हॅकर्सनी १५ हजार डॉलर्समध्ये ३.३ लाख क्रेडिट आणि डेबिट कार्ड डिटेल्स विकले आहेत. या अहवालात असेही म्हटले गेले आहे की, बहुतेक सायबर गुन्हेगार कंपन्यांनी त्या गिफ्ट कार्डना बंद करण्यापूर्वीच लवकरात लवकर या कार्डमधून पैसे काढतात. या अहवालानुसार,हे दोन्ही डेटाबेस गिफ्ट कार्ड ऑक्शन प्लॅटफॉर्म कार्डपूल वरून घेण्यात आला आहे, जो कोविड दरम्यान बंद झाला होता आणि तो अमेरिकेत खूपच लोकप्रिय होता.

बिटकॉइनमार्फत डेटा विकला जातो.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, क्रिप्टो करन्सी बिटकॉइनच्या माध्यमातून असा डेटा अज्ञात किंमतीमध्ये डार्क वेबवर विकला जात आहेत. या डेटासाठी, हॅकर्स टेलिग्रामद्वारे देखील संपर्क साधत आहेत. ज्यावर युझर्सचा डेटा स्टोअर करण्यासाठी पेमेंट कार्ड इंडस्ट्री डाटा सिक्योरिटी स्टॅण्डर्डचे पालन करते. कार्ड फिंगरप्रिंट तयार करण्यासाठी हॅकर्स हॅश अल्गोरिदम वापरू शकत असल्यास ते मास्कस्ड कार्ड नंबर देखील डिक्रिप्ट करू शकतात. अशा परिस्थितीत सर्व कार्डधारकांचे अकाउंट धोक्यात येऊ शकते.

देशाच्या परकीय चलन साठ्यात घट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या