27 C
Latur
Friday, February 26, 2021
Home आंतरराष्ट्रीय ऑस्ट्रेलियात ऑक्सफोर्डच्या लसीचे ३ कोटी डोस तयार

ऑस्ट्रेलियात ऑक्सफोर्डच्या लसीचे ३ कोटी डोस तयार

एकमत ऑनलाईन

सीडनी : जगभरातील २१० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रभावाने हाहाकार निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असताना जगभरातील लोकांना कोरोनाच्या सुरक्षित आणि परिणामकारक लसीची प्रतिक्षा आहे. रशिया आणि चीनमध्ये लसीच्या दुस-या आणि तिस-या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याआधीच आपातकालीन स्थितीतील वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. या अंतर्गत जास्त जोखिमेच्या ठिकाणी काम करत असलेल्या तसेच, आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना लस द्यायला सुरूवात झाली आहे.

या महिन्यात लसीकरणाची सुरूवात झाली असून ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड एक्स्ट्राजेनकाची लस जवळपास यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. या लसीबाबत ऑस्ट्रेलियातून एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाची कंपनी सीएसएस लिमिटेडने ऑक्सफोर्ड- एक्स्ट्राजेनकाच्या कोरोना लसीचे उत्पादन सुरू केले आहे. ऑस्ट्रेलिया मिडिया रिपोर्ट्सनुसार सोमवारपर्यंत कंपनी विक्टोरियामध्ये तीन कोटीं लसींच्या डोसचे उत्पादन झालेले असू शकते. ऑस्ट्रेलियातून आलेल्या या माहितीमुळे आशेचा किरण दाखवला आहे.

ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनीमध्ये २-जीबी रेडियोच्या माहितीनुसार, आरोग्यमंत्री ग्रेग हुंट यांनी या दाव्याला पाठिंबा दिला आहे. त्यांनी सांगितले की, ऑक्सफोर्ड एक्स्ट्राजेनकाची लस तयार झाल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केलं जाणार आहे. आरोग्यमंत्री ग्रेग हुंट यांनी सांगितले की, आम्हाला असा विश्वास आहे, ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येच्या तुलनेत लसी जास्त प्रमाणात तयार झाल्या आहेत. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चमध्ये सर्व सामान्यांना ही लस दिली जाण्याची शक्यता आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तासनुसार या लसीवर पूर्णपणे प्रक्रिया करण्यासाठी जवळपास ५० दिवसांचा कालावधी लागू शकतो. या लसीच्या उत्पादनासाठी एक्ट्रासजेनका कंपनी आणि ऑस्ट्रेलियन सरकारने करार केला आहे.

ऑक्सफोर्ड एक्स्ट्राजेनकाच्या लसीला आतापर्यंत ऑस्ट्रेलियातील वैद्यकिय चिकित्सक प्रशासनाकडून सहमती मिळालेली नाही. या वर्षाच्या शेवटापर्यंत तिस-या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाचे ४ लाख ९४ हजार ६५७ रुग्ण सक्रिय आहेत. तर या आजारापासून बरे होणा-यांची संख्या ८० लाख १३ हजार ७८३ आहे. देशात आतापर्यंत एकूण ८६ लाख ३६ हजार ०१२ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासांत ४४,२८१ नवीन रूग्णांची नोंद झाली आहे, तर ५१२ जणांचा मृत्यू झाला आहे.

आण्णासाहेब पाटील महामंडळावरील नियुक्त्या रद्द

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या