24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeआंतरराष्ट्रीयमहिंदा राजपक्षेंची ३ तास सीआयडी चौकशी

महिंदा राजपक्षेंची ३ तास सीआयडी चौकशी

एकमत ऑनलाईन

कोलंबो : श्रीलंकेत ९ मे रोजी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणा-या आंदोलकांवर माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांनी हल्ले केले होते. महिंदा राजपक्षे यांची त्या प्रकरणी सीआयडीकडून तीन तास चौकशी करण्यात आली आहे. ९ मे रोजी श्रीलंकेत उसळलेल्या हिंसाचारात १० लोकांचा मृत्यू झाला होता आणि २०० जण जखमी झाले होते.

माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांनी आंदोलकांकवर हल्ले केले होते. आंदोलकांनी महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी हिंसाचार घडविला होता. श्रीलंकेची अर्थव्यवस्था कर्जात बुडण्यास राजपक्षे बंधू आणि परिवार कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला होता. राष्ट्रपती पदावर असलेल्या गोताबाया राजपक्षे यांच्या आणि तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. आंदोलकांचा दबाव वाढल्यानंतर महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला होता. राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी देशातील परिस्थिती हाताळण्यासाठी आणि नियंत्रणात आणण्यासाठी माजी पंतप्रधान रानिल विक्रमंिसघे यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपद स्वीकारण्याची विनंती केली होती. रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर अर्थ खात्याची जबाबदारी स्वत: कडे घेतली आहे. येत्या काळातील श्रीलंकेतील सरकारी मालकीच्या हवाई वाहतूक कंपनीचे खासगीकरण करण्यात येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या