23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचीनमध्ये ३ वर्षांच्या मुलांचेही होणार लसीकरण

चीनमध्ये ३ वर्षांच्या मुलांचेही होणार लसीकरण

एकमत ऑनलाईन

बीजिंग : चीनमध्ये आता ३ वर्षांच्या मुलांनाही कोरोनाची लस देण्यात येणार आहे. सिनोवॅक बायोटेकच्या कोरोना विरोधी लसीला चीननं आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. ३ वर्षांपासूनच्या मुलांना कोरोना विरोधी लस देणारा चीन जगातील पहिला देश ठरणार आहे. चीनमध्ये आता ३ ते १७ वर्षांपर्यंतच्या मुलांना सिनोवॅक बायोटेकची लस देण्यात येणार आहे. चीनमध्ये सध्या १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांनाच कोरोनाची लस देण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम प्रत्येक देशाकडून राबविण्यात येत आहे. चीनमधील सरकारी माध्यमांना एका अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे चेअरमन यिन वीडोंग यांनी लहान मुलांच्या लसीकरणाबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, चीन सरकारने अद्याप लहान मुलांच्या लसीकरणाबाबतची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. चीनच्या लसीकरण मोहीमेची जबाबदारी असलेल्या आरोग्य अधिकाºयांच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लसीच्या चाचण्या यशस्वी
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार सिनोवॅक लसीच्या पहिल्या आणि दुसºया टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. यात लहान मुलांच्या शरीरात कोरोना विरोधी अँटीबॉडी तयार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यासोबतच लसीचे कोणतेही दुष्परिणाम देखील लहान मुलांमध्ये आढळून आलेले नाहीत. पहिला डोस घेतल्यानंतर मुलांमध्ये एका आठवड्याच्या आत १० पट अँटीबॉडी तयार होत असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. तर १५ दिवसांनी यात वाढ होऊन हेच प्रमाण २० पट होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अमेरिकेत जाणा-या विद्यार्थ्यांचे पुन्हा लसीकरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या