28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeआंतरराष्ट्रीयजगातील भारतीय वंशाच्या ४ शक्तीशाली व्यक्ती

जगातील भारतीय वंशाच्या ४ शक्तीशाली व्यक्ती

एकमत ऑनलाईन

लंडन : लंडनचे नवे पंतप्रधान म्हणून भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची सोमवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी निवड झाली. भारतीय वंशाच्या व्यक्ती जगात भारी असून, आज जगातील शक्तीशाली देशांतील ४ व्यक्ती उत्तम नेतृत्व करीत आहेत. त्यामध्ये ऋषी सुनक यांच्यासह कमला हॅरिस, प्रविंद जगन्नाथ आणि अ‍ँटोनियो कोस्टा यांचा समावेश आहे.

ऋषी सुनक
भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. १९० खासदारांचे समर्थन सुनक यांना मिळाले आहे. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काल पंतप्रधानपदाच्या रेसमधून माघार घेतल्यानंतर ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर होते. ऋषी सुनक हे ब्रिटनचे अर्थमंत्री राहिलेले आहेत. २०१५ मध्ये सुनक यांनी राजकारणात प्रवेश केला. यॉर्कशरच्या रिचमंड येथून त्यांनी विजय मिळवला होता. ब्रेक्झिटचे समर्थक म्हणून त्यांना ओळखलेजाते. त्यामुळेच त्यांना मोठी संधी मिळत गेल्याचे बोलले जाते. जॉन्सन यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते, त्यांनीच जॉन्सन यांच्या विरोधात राजीनामासत्र सुरू केले होते. आज ते पंतप्रधान पदावर विराजमान झाले आहेत. अवघ्या ७ वर्षांत त्यांनी फार मोठी झेप घेतली.

कमला हॅरिस
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अध्यक्ष झाले. त्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेच्या उपराष्ट्रपती महिला विराजमान झाली, त्या कमला हॅरिस आहेत. भारतीय वंशाची व्यक्ती अमेरिकेचा उपराष्ट्रपती होण्याचीही ही पहिलीच वेळ आहे. कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली होती. त्या भारतीय वंशाच्या आहेत. चेन्नईत राहणा-या त्यांच्या आजोबांचा त्यांच्यावर प्रभाव आहे.

प्रविंद जगन्नाथ
आणखी एक भारतीय प्रविंद जगन्नाथ हे जगातील महान नेत्यांपैकी एक आहेत. प्रविंद सध्या मॉरिशसचे पंतप्रधान आहेत. मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची पदे भूषविल्यानंतर प्रविंदकुमार जगन्नाथ यांची मॉरिशसच्या पंतप्रधानपदी एकमताने निवड करण्यात आली होती. त्यांचा जन्म ला कॅव्हर्न येथे एका भारतीय कुटुंबात झाला.

अँटोनियो कोस्टा
गोवा येथे मोझांबिक आणि अंगोला या पोर्तुगीजांच्या महत्त्वाच्या आणि दीर्घकाळ टिकलेल्या वसाहती होत्या. त्यामुळे तेथील मोझांबिक आणि अंगोलाशी गोवन लोकांचा संबंध येत असे. गोव्यातील लोक मोठ्या संख्येने आफ्रिकेत स्थलांतरित झाले आहेत. अँटोनियो यांचे आजोबा लुईस अफोन्सो मोझांबिकमध्ये होते. ४५१ वर्षाच्या पोर्तुगाल-गोवा संबंधांमुळे हजारो गोवन नागरिक पोर्तुगालमध्येही स्थायिक झाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या