वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ३ नोव्हेंबरला होत आहे. सध्या पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. भारतीय मतदारांची संख्या लक्षात घेता अमेरिकेतील मतपत्रिकांवर ५ भारतीय भाषांना स्थान देण्यात आले आहे. मतपत्रिकांवर हिंदीसह तेलगू, पंजाबी, गुजराती आणि तमिळ भाषेला स्थान देण्यात आले आहे.
अमेरिकेतील मिलन वैष्णव यांनी ५ह्या भाषांमधील बॅलट बॉक्सचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये पाच भारतीय भाषांसह नेपाळी भाषेचाही वापर करण्यात आला आहे. कॅलिफोर्नियामध्ये हा फोटो काढला असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय, सॅण्टा क्लॅरा कंट्रीमध्ये मतदारांना ई-मेलच्या माध्यमातून मतदान करतानादेखील भारतीय भाषांचा पर्याय दिला असल्याचे एका युजरने म्हटले. यामध्येही हिंदी, गुजराती, तेलगु, पंजाबी, तमिळ या भारतीय भाषेसह नेपाळी भाषेचा समावेश आहे.
अमेरिकेत मागील काही काळांपासून तेलगू भाषिकांची संख्या वाढत आहे. अमेरिकेत जवळपास चार लाख १५ हजार लोक घरी तेलगु भाषेचा वापर करतात. तर, हिंदी भाषा बोलणा-यांची संख्या ही आठ लाख ६३ हजाराच्या घरात आहे. गुजरातीत संवाद साधणा-यांची संख्या चार लाख ३४ हजार इतकी आहे. अमेरिकेत माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये भारतीय त्यातही दाक्षिणात्य भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणातील तरुणांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता अमेरिकेत तेलगू भाषिकांची संख्या वाढली असल्याचे एका अभ्यासात नमूद केले आहे. अमेरिकेत जवळपास २० लाख भारतीय-अमेरिकन वंशाचे मतदार आहेत.
परीक्षेपासून वंचित विद्यार्थ्यांची नोव्हेंबरमध्ये परीक्षा : कुलगुरु