28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयमहिन्यात शेअर बाजारातून कमावले ६६४ कोटी

महिन्यात शेअर बाजारातून कमावले ६६४ कोटी

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : शेअर बाजारात गुंतवणूक करून अनेकांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत तर अनेकांनी कोट्यवधी रुपये गमावलेत. पण अमेरिकेतील एका विद्यार्थ्याने मात्र केवळ एकाच महिन्याच्या कालावधीत शेअर बाजारातून तब्बल ६६४ कोटी रुपये नफा मिळवल्याची घटना घडली आहे.

अ‍ॅप्लाईड मॅथेमॅटिक्स अ‍ॅन्ड इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्याने ही कमाई केली आहे. जॅक फ्रिमॅन नावाच्या या २० वर्षाच्या विद्यार्थ्याने शेअर बाजाजार २१५ कोटी रुपये गुंतवले होते. एक महिन्यानंतर त्याने त्याच्याकडील असलेल्या शेअर्सची विक्री केली आणि त्यातून त्याला तब्बल ८७९ कोटी रुपयांचा फायदा झाला. या व्यवहारातून त्याने ६६४ कोटी रुपये कमावले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या