टेक्सॉस : अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका भरधाव एसयूव्हीने सिटी बसच्या स्टॉपवर उभ्या असलेल्या लोकांना चिरडले. रविवारी झालेल्या या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले.
टेक्सासमधील ब्राउन्सविले येथील एका शेल्टर होमबाहेर बस स्टॉपवर ही घटना घडली. मृतांमध्ये काही स्थलांतरितांचा समावेश आहे. कार चालक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोकांना चिरडल्यानंतर वाहन उलटले आणि २०० फूट अंतरापर्यंत घसरत गेले.