24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेत एका दिवसात ८० हजार नवे रुग्ण

अमेरिकेत एका दिवसात ८० हजार नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : कोरोनावर नियंत्रण मिळवत असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत असले तरी दुसरीकडे परिस्थिती बिघडत असल्याचे चित्र आहे. अमेरिकेत एकाच दिवसांत जवळपास ८० हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, दुसरीकडे कोरोनाच्या दुस-या लाटेचा सामना करणा-या फ्रान्समध्ये एकाच दिवसांत ४२ हजार बाधित आढळले आहेत.

ब्रिटनमध्येही काही भागांमध्ये कठोर लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेत आतापर्यंत दोन लाख २९ हजार २८४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ८७ लाख ४६ हजारजणांना बाधा झाली आहे. अमेरिकेतील संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. अँथोनी फाऊसी यांनी संपूर्ण अमेरिकेत मास्क घालणे सक्तीचे करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

तर, युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत ३४ हजार ५०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्येही वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने काही भागात लॉकडाउनचे कठोर नियम लागू केले आहेत.

त्या ९ पत्रकारांवर १५ दिवसांची प्रवासबंदी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या