रोम : कोरोनाच्या पहिल्या लाटेचा तडाखा सहन केलेल्या इटलीमध्ये आता दुसरी लाट आली आहे. इटलीमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत असून एकाच दिवसांत ९९३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. अशीच स्थिती कायम राहिल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती आहे. त्यामुळेच आता सरकारने कठोर नियम लागू करण्यास सुरुवात केली आहे.
पंतप्रधान गिसेप कॉन्टे यांनी सांगितले की, ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त होणारी पार्टी, जल्लोषाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्याशिवाय आता नागरीक एका शहरातून दुस-या शहरातही जाऊ शकत नाही. कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा फैलावण्यास सुरुवात झाल्यानंतर एकाच दिवसात झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत.
त्यामुळे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. नवीन नियमांनुसार फक्त कामगारांना एका शहरातून दुस-या शहरात जाण्यास परवानगी असणार आहे. इटलीमध्ये करोनामुळे १२ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे.
लोको पायलटचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार