22.9 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचीनमध्ये अवघ्या २८ तासांत बांधली १० मजली इमारत

चीनमध्ये अवघ्या २८ तासांत बांधली १० मजली इमारत

एकमत ऑनलाईन

बीजिंग : चीनमध्ये तंत्रज्ञान आणि त्याचे प्रयोग सर्वश्रूत आहेत. तंत्रज्ञानाच्या जोरावर चीन दरवेळी नवनवे प्रयोग करून आश्चर्याचा धक्का देत असते. आता चीनने अवघ्या २८ तासात १० मजली इमारत उभी करण्याचा विक्रम केला आहे. या कामगिरीमुळे प्रत्येक जण हे कसे शक्य आहे, असा प्रश्न उपस्थित करत आहे. खरे तर एखादी इमारत उभी करायची असल्यास त्याची पायभरणी करण्यासाठी आठवडा जातो. त्यामुळे २८ तासांत इमारत उभी केल्याच्या व्हीडीओ बघितल्यानंतर अनेकांना विश्वास बसत नाही.

चीनच्या चांग्शा शहरात ही इमारत बांधण्यात आली आहे. या इमारत बांधणीचा व्हिडिओ यूटयूबवर १३ जूनला टाकण्यात आला होता. त्यानंतर हा व्हीडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पाच मिनिटाच्या व्हिडिओत इमारत बांधणीची पूर्ण माहिती देण्यात आली आहे. चीनमध्ये एका कंपनीने २८ तास आणि ४५ मिनिटात १० मजली इमारत उभारली आहे. ब्रॉड ग्रुपने ही कामगिरी केली आहे. या इमारत उभारणीसाठी डेव्हलपर्सने लिव्हिंग बिल्डिंग सिस्टमचा वापर केला आहे. बोल्ट आणि मॉड्यूलरच्या सहाय्याने ही इमारत उभारली आहे.

प्री फ्रॅब्रिकेटेड कंस्ट्रक्शनचा वापर केला असून या तंत्रज्ञानाचा वापर करणें खूप सोपे आहे. ब्रॉड ग्रुपच्या कारखान्यात इमारत मॉड्यूल तयार करण्यात आले होते. त्यानंतर साहित्य मोठ्या कंटेनरमध्ये भरून इमारत उभारणी करणाºया जागेवर नेण्यात आले. तिथे त्याची जोडणी केली गेली. इमारत उभारल्यानंतर त्यात वीज आणि पाण्याची जोडणी केली आहे. आता ही इमारत लोकांना राहण्यासाठी सोपवली जाणार आहे.

स्टील स्लॅबचा वापर
इमारत उभारणीत स्टील स्लॅबचा वापर करण्यात आल्याचा दावा केला आहे. पारंपरिक स्लॅबच्या तुलनेत हा १० पट हलका आणि १०० पट मजबूत असल्याचा दावा आहे. त्याचबरोबर भूकंपातही ही इमारत धक्का पोहोचणार असे सांगण्यात येत आहे.

राफेल पुढील वर्षीच हवाई दलात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या