22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयश्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या चीनच्या शिष्टमंडळाला प्रवेश नाकारला

श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या चीनच्या शिष्टमंडळाला प्रवेश नाकारला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सध्या ब्रिटनमध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. जगातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख, सरकारचे प्रतिनिधी श्रद्धांजली वाहण्यासाठी लंडनमधील वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे हॉलमध्ये पोहोचत आहेत परंतु चीन सरकारच्या शिष्टमंडळाला ब्रिटनने श्रद्धांजली वाहण्यासाठी परवानगी नाकारली आहे.

यूके संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष लिंडसे हॉयल यांनी चिनी अधिका-यांच्या शिष्टमंडळाला वेस्टमिन्स्टर ऍबे हॉलला भेट देण्याची परवानगी दिली नाही. या सभागृहात राणीची शवपेटी जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी येथे अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वृत्तात म्हटले आहे की चीनच्या शिष्टमंडळाला वेस्टमिन्स्टर ऍबे हॉलला भेट देण्याची परवानगी नव्हती कारण २०२१ मध्ये चीनने ब्रिटिश संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या काही सदस्यांवर बंदी घातली होती. या सदस्यांनी चीनच्या शिनजियांग प्रांतातील उइगर मुस्लिम समुदायाच्या लोकांवर होत असलेल्या अत्याचारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्याच वेळी, यूके संसदेच्या दोन्ही सभागृहांनी निषेधार्थ चीनचे राजदूत झेंग झेगुआंग यांच्यावर बंदी घातली होती.

चीन-ब्रिटन दरम्यान निर्बंध कायम
चीन आणि ब्रिटनने एकमेकांवर लादलेले निर्बंध अजूनही कायम असल्याचे या बातमीत म्हटले आहे. त्यामुळेच ब्रिटनने चीनच्या शिष्टमंडळाला राणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहण्याची परवानगी दिलेली नाही. ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स यांना वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे हॉलमध्ये प्रवेश करण्याच्या परवानगीचे अधिकार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या