29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home आंतरराष्ट्रीय मानवी मेंदूत छिद्र करून लावणार कॉम्प्युटर चिप

मानवी मेंदूत छिद्र करून लावणार कॉम्प्युटर चिप

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : एका वर्षाच्या आत मानवी मेंदूमध्ये लावली जाणारी कॉम्प्युटर चिप तयार केली जाईल. आणि ती मानवी मेंदूत फिट केली जाईल. म्हणजे मानवी मेंदू थेट या चिपच्या माध्यमातून कॉम्प्युटरसोबत जोडला जाईल. मानवी मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास याचा फायदा होईल, अशी माहिती उद्योगपती एलन मस्क यांनी दिली आहे.

एलन मस्क हे स्पेसएक्स, टेस्लासारख्या कंपन्यांचे मालक आहेत. तसेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही आहेत. व्यवसायाबरोबरच संशोधनक्षेत्रातील अद्भुत कामगिरींचीही त्यांना आवड आहे. मस्क यांनी २०१६ मध्ये न्यूरालिंक कंपनीची स्थापना केली होती. ही एक अल्ट्रा हाय बँडविथ ब्रेन-मशीन इंटरफेस तयार करण्याच्या कामात गुंतली आहे.

कंपनीच्या कामाबाबत एलन मस्क यांनी जो रोगनच्या पॉडकास्ट शोमध्ये माहिती दिली. मनुष्याच्या मेंदूत चिप लावण्याचे काम एक रोबोट करेल. हे तंत्रज्ञान २५ वर्षीय फूल ब्रेन इंटरफेसच्या रूपात तयार होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. चीपच्या वापराने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने मनुष्यांवर कंट्रोल मिळवू नये यासाठी मानवी मेंदू कॉम्प्युटरसोबत जोडणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

मानवी डोक्यातून एक तुकडा काढला जाईल. रोबोटच्या माध्यमातून इलेक्ट्रोड्स मेंदूत टाकला जाईल आणि छिद्रात डिवाइस लावले जाईल. याने डोक्यावर एक छोटा डाग दिसेल. न्यूरालिंक एक अशी थ्रेड तयार करण्यावर काम करत आहे की, जी मनुष्याच्या केसाच्या दहाव्या भागाऐवढी पातळ असावी. ही थ्रेड मनुष्याच्या ब्रेन इंज्युरीला ट्रीट करण्यात काम करेल,असेही त्यांनी सांगितले.

माकडाच्या मेंदुत प्रयोग यशस्वी
मस्क म्हणाला की, आतापर्यंत या टेक्नीचा प्रयोग मनुष्यांवर करण्यात आलेला नाही. पण एका वर्षाच्या आत हे मनुष्याच्या मेंदूत लावली जाऊ शकते. तो एका माकडाच्या मेंदूत एक वायरलेस इंप्लांट लावण्यात आला आहे. या माध्यमातून माकड आपला मेंदूचा वापर करून व्हिडीओ गेम खेळू शकतो.

डिवाईसच्या रिजेक्शनचा धोका कमी
मेंदूत लावलं जाणारं डिवाइस १ इंच असेल. मेंदूत बाहेरील वस्तू ठेवण्याच्या धोक्याबाबत विचारले असता मस्क म्हणाला की, या डिवाइसच्या रिजेक्शनचा धोका फार कमी असेल.

गादी परत मागितली तर काय कराल – टिकैत यांची गर्जना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या