24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeआंतरराष्ट्रीयकोरोना विषाणुला २४ तासात मारणारे औषध तयार

कोरोना विषाणुला २४ तासात मारणारे औषध तयार

अमेरिकेतील तज्ज्ञांचा दावा, बाधित प्राण्यांवर यशस्वी उपचार

एकमत ऑनलाईन

जॉर्जिया : कोरोना विषाणुच्या संसर्गान जगभरात सुरु केलेल्या कहराला लवकरच एक वर्ष पुर्ण होईल. मात्र अद्यापपर्यंत कोरोना विषाणूला समूळ नायनाट करणारे कोणतेही औषध विकसित झाले नव्हते. मात्र अमेरिकेतील जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार कोरोना विषाणूचा केवळ २४ तासात खात्मा करणारे औषध त्यांनी विकसित केले आहे.

जॉर्जिया विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ‘मोल्नूपीराविर’ असे त्या औषधाचे नाव असून या औषधाने २४ तासांमध्ये कोरोना रुग्णाला ठणठणीत बरे करता येते. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे एक एंटी व्हायरल ड्रग असून कोरोना विषाणूला पुर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रभावी ठरत आहे. या औषधाचे नाव ‘मोल्नूपीराविर’ (एमके -४४८२/इआयडीडी-२८०१) असे आहे.

गेम चेंजर ठरण्याचा दावा
जर्नल आॅफ नेचर मायक्रोबायलॉजीमध्ये या संशोधनाबाबत माहिती छापली आहे. माहितीनुसार या औषधाने कोरोना रुग्णांमध्ये संक्रमण पसरण्यापासून रोखता येऊ शकते. तसेच पुढे उद्भवत असलेल्या गंभीर आजारांपासूनही वाचवता येऊ शकते. संशोधनाचे शास्त्रज्ञ रिचर्ड प्लेंपर यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदाच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अशा प्रकारचे औषध तयार केले आहे. हे औषध कोरोना रुग्णांसाठी गेम चेंजर ठरणार आहे, असा त्यांचा दावा आहे.
संशोधकांनी सुरुवातीला हे औषध इन्फ्लूएन्झासारखे घातक फ्लू दूर करण्यासाठी वापरले, तेव्हा ते अत्यंत प्रभावी असल्याचे आढळले. त्यानंतर फेरेट मॉडेलच्या माध्यमातून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी त्यावर संशोधन करण्यात आले.

प्राण्यांवर केले संशोधन
संशोधन करण्यासाठी, शास्त्रज्ञांनी प्रथम कोरोना विषाणूने काही ंप्राण्यांना संक्रमित केले. या प्राण्यांच्या नाकातून विषाणू सोडण्यास सुरुवात करताच त्यांना मोल्नूपीराविर दिले. त्यानंतर या संक्रमित प्राण्यांना निरोगी प्राण्यांसोबत त्याच पिंजºयात ठेवले. संशोधक जोसेफ वॉफ्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार संक्रमित प्राण्यांसोबत ठेवलेल्या निरोगी प्राण्यांमध्ये संक्रमण पसरले नाही. कोरोना संक्रमित प्राण्यांवर केलेल्या वापराप्रमाणे जर कोरोनाबाधित माणसांवरही मोल्नूपीराविर या औषधाचा वापर केला तर २४ तासांच्या आत कोरोनाचे संक्रमण कमी करता येऊ शकते, असा त्यांचा दावा आहे.

विधान परिषद निवडणुकीत आघाडीची बाजी !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या