22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभोपळ्यात बसून ६१ किमीचा प्रवास

भोपळ्यात बसून ६१ किमीचा प्रवास

एकमत ऑनलाईन

नेब्रास्का : येथील एक व्यक्ती जंप बोटीने मिसूरी नदीत पोहोचला आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीने चक्क भोपळ्यात बसून नदी ओलांडत सुमारे ६१ किमीचा प्रवास करून विक्रम केला आहे. नेब्रास्का, सिराक्यूज येथील ड्युएन हॅन्सन यांनी एक भोपळा मोठा केला म्हणजे वाढवला.

यानंतर भोपळ्याच्या आतील भाग काढला. ऑगस्ट २०२२ मध्ये सुमारे ३८३.७ किलो वजनाचा भोपळा त्याने नदीवर नेला. आपला ६० वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याच्या प्रयत्नात ड्वेनने भोपळ्यात बसून नदीत फेरफटका मारण्याचा निर्णय घेतला. सकाळी साडेसातला सुरु केलेला हा प्रवास संध्याकाळी साडेसहापर्यंत सुरु होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या