20.8 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभारत-अमेरिका संबंधाचा नवा अध्याय सुरू होणार

भारत-अमेरिका संबंधाचा नवा अध्याय सुरू होणार

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यात शुक्रवारी रात्री व्हाईट हाऊसमध्ये एक तासाहून अधिक काळ द्विपक्षीय बैठक चालली. या बैठकीत बायडन यांनी भारत आणि अमेरिका या जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशांतील संबंध अधिक मजबूत, दृढ असणार आहेत. मी दोन्ही देशांतील संबंधांचा नवा अध्याय पाहात आहे, असे म्हटले. यावेळी कोरोना महामारीविरुद्धचा लढा, वातावरण बदल, व्यापार, तंत्रज्ञान, आर्थिक सहकार्य आदींसह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

जो बायडन जानेवारी महिन्यात अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यानंतरची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. आगामी दशक कसे असेल, यावर आपले नेतृत्व महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल. आता भारत आणि अमेरिकेत मजबूत दोस्तीचे बीज रोवले गेले आहे, असे ते म्हणाले. या दशकाचे भविष्य प्रतिभा आणि लोकांच्या संबंधावर निश्चित होणार आहे. अमेरिकेच्या प्रगतीच्या दिशेत भारतीय प्रवासी महत्त्वपूर्ण योगदान देतात, याचा आपल्याला आनंद आहे. सद्यस्थितीत तंत्रज्ञान प्रेरक शक्ती बनत आहे. जगाच्या कल्याणाकरिता आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला प्रतिभेचा चाणाक्षपणे उपयोग करून घ्यायला हवा, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी मोदी यांनी दोन्ही देशांतील व्यापारी संबंधांवरही चर्चा केली.

पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी उपराष्ट्रती असताना मुंबई भेटीतला एक किस्सा सांगितला. आपल्याला भारतीय वंशाच्या महिलेशी लग्न करायचे होते. पण आपली ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. बायडन आडनावाचे लोकही भारतात राहतात. तुमचे कोणी नातेवाईक आहेत का, असे आपल्याला पत्रकार परिषदेत विचारण्यात आले. बायडन आडनावाची जवळपास ५ जण असल्याचे त्यावेळी पत्रकारांमधूनच आपल्याला कोणीतरी सांगितले. मग त्यांना शोधून भेटलं पाहिजे, असे बायडन यांनी म्हणताच उपस्थित सर्वांना हसू आले आणि बायडनही हसू लागले.

आव्हानांचा संयुक्त सामना करणे शक्य
भारत आणि अमेरिकेची लोकशाही जगात सर्वश्रेष्ठ आहे. दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ झाले पाहिजेत. त्यादृष्टीने आज नवा अध्याय सुरू झाला असून, भारत-अमेरिकेतील दृढ संबंध जागतिक आव्हानांतून मार्ग काढण्यात प्रभावीपणे काम करतील, याचा मला विश्वास आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले.

आरोग्य विभागाच्या परीक्षा लांबणीवर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या