27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयरशियन वटवाघळांमध्ये कोरोनाचा नवा विषाणू

रशियन वटवाघळांमध्ये कोरोनाचा नवा विषाणू

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : कोरोनाच्या दोन वर्षांच्या साथीनंतर जग पूर्वपदावर आले आहे. मात्र, रशियातील वटवाघळांमध्ये आढळलेला कोरोनाचा नवीन विषाणू लशीचे सुरक्षाकवच भेदून मनुष्याला संसर्ग करू शकतो, असा संशोधकांचा दावा आहे.

वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या गटाने या विषाणुबाबत संशोधन केले. याचे निष्कर्ष ‘पीएलओएस पॅथोजन्स’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. २०२० मध्ये ‘खोस्ता १’ व ‘खोस्ता २’ हे विषाणू सापडले. त्यापैकी ‘खोस्ता २’ चा मनुष्याला संसर्ग होण्याचा अधिक धोका आहे.

संशोधकांना ‘खोस्ता २’ हा विषाणू वटवाघळाच्या स्पाईक प्रोटिनमध्ये आढळला. त्याचा मनुष्याला संसर्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणे, कोरोनाची लस दिलेल्या व्यक्तींना तसेच कोरोनाच्या संसर्गानंतर प्रतिपिंडे (अ‍ॅँटीबॉडिज) विकसित झालेल्या व्यक्तींनाही खोस्ता २ विषाणुचा संसर्ग होऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. ‘खोस्ता २’ आणि ‘कोव्ह २’ हे दोन्ही विषाणू कोरोना विषाणुच्या एकाच उपश्रेणीतील आहेत. ही उपश्रेणी ‘सारबेकोव्हायरस’ या नावाने ओळखली जाते.

अलीकडच्या काही वर्षांत ‘सारबेकोव्हायरस’ मधील शेकडो विषाणूंचा शोध लागला आहे. यात आशियातील वटवाघळांमधील विषाणूंचा समावेश आहे. यासंदर्भात संशोधकांनी कोरोना लसीकरण केलेल्या व्यक्तींच्या रक्ताच्या नमुन्यांना अभ्यास केला.

प्रमुख निष्कर्ष
– ‘खोस्ता२’वर कोरोनाच्या सध्याच्या लशीचा परिणाम होत नाही.
-ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या व्यक्तींमधील प्रतिंिपडेही प्रभावहीन
– मनुष्यामध्ये संसर्ग होत असताना ‘खोस्ता २’ मधील काही जनुके वगळली जातात

सर्वंकष कोरोना लसीची गरज
केवळ कोरोनाच्या ज्ञात प्रकारांविरुद्ध लस तयार करण्याऐवजी त्याच्या सर्वच प्रकारांपासून संरक्षण देणा-या लशीची निर्मिती करण्याची गरज आहे. सध्या सार्स-कोव्ह -२ च्या पुढील प्रकारापासून तसेच एकूणच सारबेकोव्हायरस उपश्रेणीतील विषाणुपासून संरक्षण देणारी लस बनविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
– मायकेल लेटको, संशोधक

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या