23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home आंतरराष्ट्रीय कोरोनाविरूद्ध माणसावर उपचारासाठी नवीन औषध सापडू शकते

कोरोनाविरूद्ध माणसावर उपचारासाठी नवीन औषध सापडू शकते

न्यूयॉर्क : संशोधनकर्त्यांना वटवाघुळात कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी नवा रस्ता मिळण्याची शक्यता दिसत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या सस्तन प्राण्याची रोग प्रतिकारशक्ती (इम्यून सिस्टम) समजून घेतल्यास कोरोनाविरूद्ध माणसावर उपचारासाठी नवीन औषध सापडू शकते.

वटवाघुळ स्वभाविक क्षमतेद्वारे इंफ्लेमेशनला (सूज) नियंत्रित करते

अमेरिकेच्या रोचेस्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनुसार, वटवाघळात कोरोना व्हायरससह इबोला आणि रेबीजसारखे अनेक व्हायरस असतात. परंतु, या सस्तन प्राण्यात या विषाणूंना सहन करण्याची क्षमता असते, ज्यामुळे त्याच्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही. मात्र, माणसाला या विषाणूंमुळे अनेक प्रतिकुल लक्षणांचा सामना करावा लागतो. सेल मेटाबॉलिज्म जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासात संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे की, वटवाघुळ कशाप्रकारे आपल्या स्वभाविक क्षमतेद्वारे इंफ्लेमेशनला (सूज) नियंत्रित करते. त्याच्या दिर्घ जीवनकाळासाठी याच क्षमतेचे योगदान असू शकते. तसेच आजारांना तोंड देण्याची प्रवृत्ती असू शकते.

संक्रमित झाल्यानंतर मानवी रोगप्रतिकारशक्ती सुद्धा अशाच प्रकारे काम करते

रोचेस्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधक वेरा गोरवुनोवा यांनी म्हटले की, असे होऊ शकते की, कोविड-19 सह इंफ्लेमेशनच्या प्रेरित होण्याची शक्यता राहू शकते आणि यातून इंफ्लेमेशन रिस्पॉन्स सक्रिय होऊ शकतो. संक्रमित झाल्यानंतर मानवी रोगप्रतिकारशक्ती सुद्धा अशाच प्रकारे काम करते. माणसामध्ये इम्यून सिस्टम रिस्पॉन्सचे लक्ष्य व्हायरसला नष्ट करणे आणि संसर्गाशी सामना करणे हे असते.

 

 प्रतिकारशक्तीमध्ये लाभदायक संतुलन तयार होते

संशोधकांचे म्हणणे आहे की, माणसाच्या उलट वटवाघुळात अशा प्रकारचे खास तंत्रसुद्धा असते, जे व्हायरसच्या प्रतिकृती तयार करण्यावर अंकुश लावते आणि व्हायरसच्या प्रति इम्यून रिस्पॉन्सला कमी सुद्धा करते. परिणामी त्यांच्यात व्हायरसला नियंत्रित करण्याच्या प्रतिकारशक्तीमध्ये लाभदायक संतुलन तयार होते. त्यांनी म्हटले की, वटवाघुळची ही रोगप्रतिकारशक्ती समजून घेतल्यास कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी नवीन लक्ष्य साधता येईल. यातून नवीन उपचार विकसित करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
94FollowersFollow