33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home आंतरराष्ट्रीय भारतीय वंशाच्या व्यक्तीला मिळणार जगातील पहिला डोस; ८७ वर्षीय हरी शुक्ला...

भारतीय वंशाच्या व्यक्तीला मिळणार जगातील पहिला डोस; ८७ वर्षीय हरी शुक्ला घेणार पहिला डोस

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : ब्रिटनमध्ये लसीकरणाला सुरूवात होणार असून, भारतीयांसाठी ब्रिटनच्या लसीकरणात महत्त्वाची बाब म्हणजे एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला कोरोना लसीचा जगातील सर्वात पहिला डोस दिला जाणार आहे. आजपासून ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात होत आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवेतील कर्मचा-यांना लसीकरण मोहिमेत पहिल्यांदा ही लस देण्यात येणार आहे. ब्रिटनमध्ये फायझर व बायोएनटेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली. आता लसीकरण सुरू होणार असून, ही लस सर्वप्रथम भारतीय वंशाच्या ८७ वर्षीय हरी शुक्ला यांना देण्यात येणार आहे. लसीचे पहिले दोन डोस घेणे, हे माझे कर्तव्य आहे. लसीकरणासंदर्भात घोषणा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी करून एक मोठे पाऊल उचलले असल्याची भावना हरी शुक्ला यांनी लस घेण्याआधी व्यक्त केल्या आहेत.

या लसीकरणासंदर्भात फोनवरून हरी शुक्ला यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. आपण कोरोना विरोधातील या उपक्रमात सहभागी होण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. लसीचे पहिले दोन डोस घेणे आपले पहिले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही हा साथीचा आजार संपवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. ही लस घेवून मी आपले काम करत असल्याचा मला अभिमान आहे. मी जे काही करतो आहे, ते माझे कर्तव्य आहे. लसीकरण सुरू होणे हा एक फार मोठा दिलासा आहे, कारण हे एक सामान्य संकट नाही. मी घाबरलो आहे, असे काही नाही. मी खूप उत्सुक असल्याचे हरी शुक्ला म्हणाले.

दिल्ली येथील शेतकऱ्यांना पाठींबा देत लोहारा शहर बंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या