27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअंगोलाच्या खाणीत गुलाबी हि-याची चमक

अंगोलाच्या खाणीत गुलाबी हि-याची चमक

एकमत ऑनलाईन

जोहान्सबर्ग : अंगोलातील खाणीत १७० कॅरेटचा दुर्मिळ गुलाबी हिरा सापडला आहे. गेल्या ३०० वर्षांत सापडलेल्या गुलाबी हि-यांमधील हा सर्वांत मोठा हिरा असल्याचा दावा केला जात आहे.

या हि-याला ‘लुलो रोझ’ असे नाव देण्यात आले. ऑस्ट्रेलियातील ‘लुकापा डायमंड कंपनी’ने त्यांच्या संकेतस्थळावर याबाबत घोषणा केली आहे. लुकापा व तिच्या सहयोगी कंपन्यांना अंगोलातील लुलो खाणीत उत्खनन करताना हा हिरा सापडला.

हा इतिहासातील सर्वांत मोठा गुलाबी हिरा असल्याचे कंपनीने त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. दहा हजार हि-यांमध्ये एक गुलाबी हिरा सापडतो.

सर्वांत मोठा गुलाबी हिरा सापडणे म्हणजे अत्यंत दुर्मिळ गोष्ट सापडण्यासारखे आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टिफन वेदरऑल यांनी सांगितले. लिलावात गुलाबी हि-याला निश्चितपणे मोठी रक्कम मिळेल, पण याच्या विशिष्ट रंगामुळे कोणत्या प्रकारचे शुल्क भरावे लागेल याची कल्पना नसल्याचे ते म्हणाले.

लुलो ही गाळयुक्त खाण आहे. म्हणजे नदीच्या पात्रातून खडे शोधले जातात. लुकापा ही कंपनी साधारणपणे जमिनीखालील खडकाळ भागात हिरे शोधण्याचे काम करते, असे वेदरऑल यांनी कंपनीच्या ऑस्ट्रेलियातील मुख्यालयातून सांगण्यात आले.

मौल्यवान हिरा
लुलो खाणीत सापडलेल्या हि-यांमधील ‘लुलो रोझ’ हा पाचवा मोठा हिरा

या खाणीत १०० कॅरेट किंवा त्यापेक्षा जास्त वजनाचे २७ हिरे
आतापर्यंत सापडले आहेत

गुलाबी हिरा अंगोलाच्या ‘सोडियम’ या हिरे बाजार कंपनीच्­या
मार्फत आंतरराष्ट्रीय निविदा काढून विकण्यात येणार

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या