31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचीन लोकशाहीसाठी गंभीर आव्हान-तैवानचा चीनवर हल्लाबोल

चीन लोकशाहीसाठी गंभीर आव्हान-तैवानचा चीनवर हल्लाबोल

एकमत ऑनलाईन

ताईपेई : तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांनी तैवानच्या राष्ट्राय दिनी आपल्या भाषणादरम्यान चीनवर जोरदार हल्लाबोल केला. चीन हा जगभरातील लोकशाही असलेल्या देशांसाठी एक आव्हान बनला आहे. भारत आणि चीनदरम्यान झालेली हिंसक चकमक याचेच एक उदाहरण असल्याचे त्या म्हणाल्या. जर चीन दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारू इच्छितो तर आम्हीदेखील चर्चेसाठी तयार आहोत, असे वेन म्हणाल्या.

दक्षिण चीन महासागरातील वाद, भारत चीन सीमेवरील चकमक, हाँगकाँगमधील चीनचा हस्तक्षेप हे स्पष्टपणे दाखवून देत आहे की या क्षेत्रांमध्ये लोकशाही, शांतता आणि समृद्धी यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले आहे. आम्ही आमची संरक्षण क्षमता वाढवत आहोत आणि सैन्य आमचे भविष्य आहे. या क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत राहू, असेही वेन म्हणाल्या.

आम्ही देशात अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि पाणबुड्यांची निर्मिती करत आहेोत. तसंच जवानांना उत्तमोत्तम प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. चिनी लष्कराच्या कारवाया अयोग्य आहेत. राष्ट्राची सुरक्षा आणि लोकशाहीवर कोणताही बाहेरील देशाचा प्रभाव पडू नये, यासाठी अनेक देश एकत्र येत आहेत. जर चीनला शत्रूत्व विसरून संबंध सुधारण्याची इच्छा असेल तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असेही त्या म्हणाल्या.

महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्राची नवी नियमावली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या