23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअ‍ॅड. दीपक चटप ‘चेव्हनिंग ग्लोबल लीडर’

अ‍ॅड. दीपक चटप ‘चेव्हनिंग ग्लोबल लीडर’

एकमत ऑनलाईन

चंद्रपूर : विधायक कामाचा वसा घेतलेल्या दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातील अ‍ॅड. दीपक यादवराव चटप हा तरुण वकील ब्रिटिश सरकारचा ‘चेव्हनिंग ग्लोबल लिडर’ ठरला.

ब्रिटीश सरकारतर्फे देण्यात येणा-या ‘चेव्हेनिंग’ या जागतिक प्रतिष्ठेच्या ४५ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचा मानकरी झाला. अवघ्या २४ व्या वर्षी ही शिष्यवृत्ती मिळवणारा देशातील तो पहिला तरुण वकील ठरला आहे.

सामाजिक नेतृत्व करू इच्छिणा-या जगभरातील युवकांना ब्रिटिश सरकार ही शिष्यवृत्ती देते. लंडनच्या ‘सोएस’ या जगातील सर्वोत्तम विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी दीपकची निवड झाली. त्याच्या कामाची दखल घेत शिक्षणाच्या संपुर्ण खर्चाची जबाबदारी ब्रिटीश सरकारने घेतली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या