26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeआंतरराष्ट्रीयजॉन्सन ऍण्ड जॉन्सन च्या कोरोना लसीमुळे शरीरावर दुष्परिणाम

जॉन्सन ऍण्ड जॉन्सन च्या कोरोना लसीमुळे शरीरावर दुष्परिणाम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अमेरिकेतील जॉन्सन ऍण्ड जॉन्सननेही कोरोनावर लस निर्माण केली आहे. मात्र, या लसीच्या चाचण्या अचानक काही काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत. या वृत्ताला जॉन्सन ऍण्ड जॉन्सन कंपनीनेही दुजोरा दिला आहे. कोरोना विषाणूने जगभर हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. या विषाणूवर अद्याप लस आलेली नाही.

मात्र, गेल्या सहा ते सात महिन्यापासून जगभरात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीचे संशोधन सुरू आहे. अनेक औषध कंपन्या आणि संशोधक संस्था कोरोनावरील लस शोधून काढण्यासाठी युद्ध पातळीवर काम करत आहेत. यावर जॉन्सन ऍण्ड जॉन्सननेही कोरोनावर लस निर्माण केली आहे. मात्र, या लसीच्या चाचण्या अचानक काही काळासाठी थांबवण्यात आल्याने जगभर खळबळ माजली आहे.

जॉन्सन ऍण्ड जॉन्सन कंपनीने शोधलेल्या कोरोना लसीची चाचणी सुरू होती. यासाठी काही स्वयंसेवकांवर लसीचे प्रयोग करण्यात आले होते. मात्र, चाचणीमध्ये सहभागी झालेल्या काही स्वयंसेवकांची प्रकृती अचानक बिघडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चाचण्या तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्या आहेत, अशी माहिती जॉन्सन ऍण्ड जॉन्सनन कंपनीने दिली आहे.

पहिला डोसमध्ये प्रचंड रोगप्रतिकारक शक्ती निर्माण
अमेरिकेत मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांप्रमाणे जॉन्सन ऍण्ड जॉन्सनने कोरोनावर लस शोधून काढली आहे. या लसीच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. प्रायोगिक लसीचा सिंगल डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली.

दुस-या डोसमध्ये शरीरावर परिणाम नाहीत
जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही स्वयंसेवकांच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम दिसले नव्हते. त्यामुळे ही लस कोरोनावर अत्यंत प्रभावी समजली जात आहे. मात्र, चाचणीमध्ये सहभागी झालेल्या काही स्वयंसेवकांची प्रकृती अचानक बिघडल्याचे समोर आले. त्यामुळे चाचण्या तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्या आहेत़ दरम्यान, या मागील कारण शोधण्यात वैज्ञानिक व्यस्त असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

भाजपाच्या मंदिर आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या