26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकोरोनानंतर आता न्यूयॉर्कमध्ये पोलियोची भीती

कोरोनानंतर आता न्यूयॉर्कमध्ये पोलियोची भीती

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : अमेरिकेत कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता एका संसर्गाचा धोका वाढला आहे. न्यूयॉर्कमध्ये पोलियोचे रग्ण वाढल्यानंतर आता शहरात अलर्ट जारी करण्यात आला. न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी होचुल यांनी न्यूयॉर्कमध्ये पोलियो व्हॅक्सिनेशन वाढवण्याचे आदेश दिले असून शहरात अपात्कालिन स्थिती घोषित करण्यात आली आहे. सोबतच अधिका-यांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.

आरोग्य विभागाकडून पोलियो व्हायरस फार घातक असल्याचे सांगितल्या जात आहे. तूर्तास निष्काळजीपणामुळे येत्या दिवसांत या रोगाने लोकांचा मृत्यू होण्याचाही धोका असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. पोलियो व्हायरल हा लहान मुलांसाठी सगळ्यात घातक असून या व्हायरसवर केवळ व्हॅक्सिनच्या मदतीनेच नियंत्रण ठेवता येऊ शकते.

अमेरिकेत १९५२ मध्ये पसरला होता पोलियो
पोलियो व्हॅक्सिन सुरू होण्याआधी १९५२ मध्ये अमेरिकेमध्ये पोलियोचे ५८००० रूग्ण मिळाले होते. तर ३१४५ रूग्णांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक मुले अपंग झाले होते. त्यानंतर अमेरिकेत पोलियोविरोधात व्हॅक्सिनेशन मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पोलियोच्या रूग्णांमध्ये घट झाली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या