34.3 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभीषण स्फोटानंतर आता बैरुतमध्ये आगीचे तांडव

भीषण स्फोटानंतर आता बैरुतमध्ये आगीचे तांडव

एकमत ऑनलाईन

लेबनानची राजधानी बेरूतमध्ये मागील महिन्यात झालेल्या भयंकर स्फोटानंतर पुन्हा एकदा हृदयाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. आता तेथील एका बंदरात भीषण आग लागली आहे. आगीतून भयंकर ज्वाला निर्माण होताना दिसत आहे आणि चारही बाजूंना काळा धूर पसरला आहे. घटनास्थळावर फायरब्रिगेडच्या अनेक गाड्या पोहचल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बंदरात आग लागल्यानंतर तेथे हलकोल्लाळ सुरू आहे.भयंकर स्फोटानंतर बैरुतमधील ही दुसरी मोठी दुर्घटना आहे.

गोदामात ठेवलेल्या ऑइल आणि टायरला लागलेल्या या आगीमुळे ही घटना घडली असल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे. धूराच्या प्रचंड लोटामुळे आकाश भरून गेल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या भीषण आगीने 4 ऑगस्टला झालेल्या स्फोटाच्या आठवणी ताज्या केल्या. आगीमुळे लोक घाबरून सैरावेैरा पळत सुटले होते. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहचल्या आहेत.

https://youtu.be/TR7XcGIqSC0

या घटनेवर लेबनानच्या लष्कराने म्हटले आहे की, इंजिनचे तेल आणि टायर्सच्या एका गोडाऊनमध्ये आग लागली, या आगीने विक्राळ रूप धारण केले आहे. हेलीकॉप्टर्सच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बंदरावर लागलेली भीषण आग आणि आकाशात पसरलेला काळा धूर पाहून लोकांना एक महिन्यापूर्वी घडलेल्या दुर्घटनेची आठवण झाली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या