23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeआंतरराष्ट्रीयतालिबान्यांशी अहमद मसूद यांचा अद्यापही संघर्ष

तालिबान्यांशी अहमद मसूद यांचा अद्यापही संघर्ष

एकमत ऑनलाईन

काबूल : अफगाणिस्तानातील बंडखोरांचा बालेकिल्ला असलेल्या पंजशीर खो-याच्या मोठ्या भागावर तालिबानने ताबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. बंडखोरांना पाठिंबा देणा-या लोकांना लक्ष्य केले जात आहे. माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या भावाची तालिबान्यांनी निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर आता पंजशीर खो-यातून तालिबानचा प्रतिकार करणारा अहमद मसूदही पंजशीर सोडून टर्की येथे पळून गेल्याची माहिती समोर येत होती. त्यानंतर आता अहमद मसूद अद्यापही अफगाणिस्तानात आहे अशी माहिती समोर आली आहे.

पंजशीरच्या ७० टक्के मुख्य भागांवर आता तालिबानचे नियंत्रण आहे. इराणीच्या फार्स या वृत्तसंस्थेने काही सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूद टर्की किंवा इतर कोणत्याही देशात पळून गेल्याच्या अफवा खोट्या आहेत. मसूद हा अफगाणिस्तानातच सुरक्षित ठिकाणी आहे असे म्हटले आहे. तालिबानने गेल्या आठवड्यात आतापर्यंत अंिजक्य असलेल्या पंजशीर प्रांत ताब्यात घेतल्याचा दावा केला होता. मात्र, तालिबानचा मुकाबला करणा-या बंडखोर लष्कराने राष्ट्रीय विरोध आघाडीने (एनआरएफ) हा दावा फेटाळला. एनआरएफचे नेतृत्व अहमद मसूद आणि अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह करत आहेत. सालेह यांनी स्वत:ला अफगाणिस्तानचे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून घोषित केले होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या