22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयएअर इंडियाच्या विमानाला मस्कतमध्ये आग

एअर इंडियाच्या विमानाला मस्कतमध्ये आग

एकमत ऑनलाईन

मस्कत : एअर इंडिया एक्स्प्रेसची मस्कतहून कोचीनला जाणारी फ्लाइट विमानात धूर दिसल्यानंतर रद्द करण्यात आली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसची फ्लाइट क्रं.४४२ मस्कतहून कोचीनला जाणार होती असे सांगण्यात येत आहे. तेवढ्यात फ्लाइटमध्ये धूर दिसून आला. यानंतर उड्डाण रद्द करण्यात आले.

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाच्या मागे उभ्या असलेल्या विमानातून धुराची तक्रार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर टेक ऑफ टाळण्यात आले. या घटनेच्या वेळी विमानात १४७ प्रवासी आणि क्रू मेंबर्स उपस्थित होते. मात्र, सर्वजण सुरक्षित आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइटमध्ये १४१ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. मात्र, सर्वजण सुरक्षित आहेत. त्याचवेळी अभियंत्यांची एक टीम विमानाची तपासणी करत आहे. या घटनेनंतर एअर इंडिया एक्स्प्रेस प्रवाशांसाठी दुस-या विमानाची व्यवस्था करत आहे. जेणेकरून प्रवाशांना मस्कतहून कोचीनला आणता येईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या