29 C
Latur
Monday, March 20, 2023
Homeआंतरराष्ट्रीयथायलंडमध्ये वायू प्रदूषणामुळे २ लाख नागरिक रुग्णालयात

थायलंडमध्ये वायू प्रदूषणामुळे २ लाख नागरिक रुग्णालयात

एकमत ऑनलाईन

बँकॉक : थायलंडची राजधानी बँकॉक येथील रुग्णालयात गेल्या एका आठवड्यात २ लाख लोकांना दाखल करण्यात आले आहे. वायुप्रदूषणामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. बँकॉक पर्यटनस्थळी उद्योग, वाहनांमधून निघणारा धूर, शेतात जाळलेली खराब पिके यामुळे लोक त्रस्त झाले आहेत.

सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एअर शोमुळे तीन महिन्यांत १.३ दशलक्ष लोक आजारी पडले. त्यापैकी २ लाख लोकांना गेल्या आठवडाभरात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने लोकांना एन-९५ मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर लहान मुले आणि महिलांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

निर्बंध लादण्याची शक्यता
वायू प्रदूषणाचा धोका इतका वाढत आहे की बँकॉकच्या अधिका-यांनी जानेवारीपासून लोकांना घरून काम करण्याचा सल्ला दिला होता. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वाहनांमधून निघणा-या धूरावर लक्ष ठेवण्यासाठी चौक्या तयार करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नर्सरी आणि शाळांमध्ये नो डस्ट रूम बनविण्यात आल्या आहेत. यामध्ये एअर प्युरिफायर बसवण्यात आले आहेत. सध्या शाळा बंद करण्यात आलेल्या नाहीत. अधिकारी म्हणतात की धोका संपलेला नाही. आगामी काळात लोकांना घरात ठेवण्यासाठी कडक निर्बंध लादावे लागतील.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या