37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयएलन मस्क दुस-यास्थानी

एलन मस्क दुस-यास्थानी

एकमत ऑनलाईन

मुंबई : एलन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाही, तेही त्याच्या एका फक्त एका ट्विटमुळे. बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अलीकडेच अशी बातमी आली की एलन मस्कने बिटकॉइन विकत घेतला आहे, त्यानंतर बिटकॉइनचा विक्रम उच्चांपर्यंत पोहोचला. पण आता बिटकॉइन त्या उंचीवरून घसरला आहे आणि इलोन मस्कलाही भारी नुकसान सहन करावे लागले आहे.

एलन मस्कचे नाव जुळताच बिटकॉइनने ५८ हजार डॉलर्सची विक्रम नोंद केली होती, परंतु त्यांच्या एका ट्विटने हा बिटकॉइन परत ५० हजारच्या पातळीवर आला. बिटकॉइन आणि इथरच्या किंमती जास्त आहेत, असे ते म्हणाले तेव्हा त्यानंतर ही घसरण झाली. यानंतर सोमवारी टेस्लाच्या शेअर्समध्येही ८.५ टक्क्यांनी घसरण झाली आणि ज्यामध्ये एलन मस्कच्या संपत्तीमधून १५ अब्ज डॉलर पेक्षाही जास्तीचे नुकसान झाले. एलोन मस्क यांनी ट्विटरला आपल्या आवडत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की टेस्लाने बिटकॉइनमध्ये १५० कोटी डॉलर पेक्षा अधिक पैशाची गुंतवणूक केली आहे.

टेस्लाचे शेअर्स पडल्यामुळे एलन मस्क आता जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेली नाही आणि त्याचमुळे जेफ बेजोस आता त्याच्या पूर्वपदावर आले आहे. आता दुस-या क्रमांकावर आले, त्यांची संपत्ती आता कमी होऊन १८३.४ अब्ज डॉलरवर आली आहे. जी याआधी जानेवारीमध्ये २१० अब्ज डॉलर इतकी होती, आणि त्याचमुळे अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस परत एकदा पहिल्या क्रमांकावर आले आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या